
सावंतवाडी : जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. कोणी येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे असं मत उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केल. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ आम्हाला द्यावा यासाठी एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. पक्षप्रमुखांकडे शिवसैनिकांची भावना पोहचवणार आहे असं मत व्यक्त केले.
भाजप नेते उबाठा शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या चर्चांबद्दल तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना विचारलं असता, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, जर पक्षात कोणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करू, कोणी येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आम्हाला पक्ष वाढावयाचा आहे. पक्षाचा आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे असं मत व्यक्त केले. विधानसभेत आमच्या दृष्टीने भगवा फडकवण आणि केसरकरांचा पराभव करण हे महत्त्वाचे आहे. घारेंना तस वाटत असेल तर त्या पद्धतीची बांधणी आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या पक्षाकडे विजयाची संधी जास्त राहिल. आजच्या क्षणाला आमची ताकद अधिक आहे. आमची बांधणी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत असल्यानं आमची प्रमुख मागणी आहे. महाविकास आघाडीत आमची ताकद अधिक असल्याच आम्ही पक्षप्रमुखांना कळवले आहे. जर पक्षात कुणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. कुणी येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पक्ष वाढत असेल पक्ष आम्हाला वाढावयाचा आहे. पक्षाचा आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे. आमचं स्वप्न भगवा फडकवण आहे. मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी बाबुराव धुरी, चंद्रकांत गावडे, रूपेश राऊळ, बाळू परब, मायकल डिसोझा ही नाव पक्षाकडे गेली असल्याचही ते म्हणाले.
दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातला आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असावा यासाठीचा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. तसा ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे. सावंतवाडीतून मशाल चिन्हावर लढणारा उमेदवार असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. हा ठराव संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या मार्फत पक्षप्रमुखांना पाठवणार आहे अशी माहिती श्री.राऊळ यांनी दिली. तसेच बाहेरच्या तालुक्यातील लोक इथे येऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करतात ही बाब दुर्देवी आहे. इथल्या शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाला तर त्यांचं दुखणं तो जाणू शकतो. लोकांचं दुःख जाणू शकतो. कोणी यावं टीचकी मारून जावं, आमदारकीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मतदारसंघ नाही अस मत उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, प्रकाश गडेकर, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.