सावंतवाडी शिवसेनेच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध

Edited by: विनायक गांवस
Published on: September 14, 2024 10:21 AM
views 222  views

सावंतवाडी : शिवसेना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून दिलेल्या राज्यव्यापी आदेशाप्रमाणे सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर शिवसेना पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांनी परदेशात जावून आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधान बचाव राहुल गांधी यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपातालुकाप्रमुख गजानन नाटेकर, संजय माजगावकर, विभागप्रमुख शेखर मांजरेकर, महेश ऊर्फ पप्पू सावंत, राजन परब, शंकर नाईक, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, सौ. शर्वरी धारगळकर, सो. शिवानी पाटकर, सौ. शुभांगी सुकी, चराठा सरपंच सौ. प्रचिती कुबल, महिला तालुका उपसंघटक सौ. सेजल लाड, उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, विजय देसाई,  रुपेश नाटेकर, युवासेना अमित हवालदार, तालुका उपसंघटक संजय गावडे, उपतालुकाप्रमुख जिवन लाड, कृष्णा लाखे, शाखाप्रमुख अभय राणे, राजन बरागडे, बापु कोठावळे, शहरसचिव विश्वास घाग,  एकनाथ हळदणकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.