
सावंतवाडी : आंबोली व माडखोल या जिल्हा परिषद मतदार संघासाठी दिनेश गावडे यांना निवडणुक प्रभारी नेमले आहे. तसेच कोलगांव व तळवडे या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विद्याधर परब, इन्सुली व बांदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विनायक दळवी, मळेवाड व आरोंदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी एकनाथ नारोजी यांना निवडणूक प्रभारी म्हणुन नेमले आहे. तर माजगांव या जिल्हा परिषद मतदार संघासाठी गुणाजी गावडे यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे.
सावंतवाडी तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये आंबोली, माडखोल कोलगांव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी सुभाष गावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तसेच इन्सुल, तळवडे, बांदा, मळेवाड, आरोंदा, माजगांव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी गुणाजी गावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. हे दोन्ही निवडणूक प्रभारी निवडणूकीच्या संदर्भात तालुका प्रमुख जिल्हाप्रमुख यांच्याशी समन्वय साधतील आवश्यक माहिती पुरवतील व त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहतील अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.आगामी लोकसभा निवडणूक २०२४ चा प्रचार चालु आहे. प्रचार यंत्रणा अधिक मजबूत व्हावी यादृष्टीने सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. हे निवडणूक प्रभारी हे त्या-त्या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये काम करुन या संदर्भातील माहिती देणे त्याप्रमाणे त्या विभागातील संघटना मजबुत करण्याची सर्व जबाबदारी घेतील. विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख या संदर्भातील जे कामकाज चालु आहे त्याची माहिती तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुख यांना देतील.
इलेक्शन काळामध्ये पूर्ण इलेक्शन यंत्रणा सुसज्ज राहील व ही यंत्रणा पुढे येणा-या निवडणुकीमध्ये कशी सुसज्ज राहील याचा समन्वय हे प्रभारी साधतील. एका निवडणुक प्रभारीकडे दोन जिल्हा परिषद मतदार संघ असतील अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.