तेरवण मेढेत 'शिव नामाचा' जयघोष !

भाविकांच्या जनसागरात - भक्तिमय वातावरणात शिवउत्सव
Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2024 06:10 AM
views 74  views

दोडामार्ग : पांडवकालीन जागृत देवस्थान आणि तीर्थक्षेत्र अशी ख्याती असलेल्या तेरवण मेढे येथील नागनाथ मंदिरा महाशिवरात्री उस्तवाला हजारो भक्तांचा जनसागर लोटला. "हर हर महादेव व बम बम भोले" या शिव नामाचा जयघोष करत  तेथील पवित्र तीर्थतळीत भाविकांनी तीर्थस्नान करून श्री नागनाथची मनोभावे पूजा अर्चा करत दर्शन घेतले. पहाटेपासूनच सुरु झालेला भक्तांचा महापूर सायंकाळी उशिरापर्यंतकायम होता. तेथील स्थानिक सल्लागार समिती, ग्रामस्थ तसेच प्रशासन यांच्या चोख नियोजनामुळे आणि तेरवण मेढेतील हा उस्तव मोठ्या भतिमय वातावरणात संपन्न झाला. 

  यावर्षी नव्याने बांधकाम सुरू असलेलं मंदिर इमारतीचं काम आणि त्यामुळे प्रशस्त झालेला दर्शन मार्ग यामुळे भाविकांना प्रथमच श्री देव नागनाथ चे मनोभावे दर्शन घेता आले. तसेच तीर्थस्नान तळी तसेच दर्शन मंडपाचा विस्तार झाल्याने भाविकांचीही मोठी सोय झाली. सोनावल माध्यमिक विध्यालायचे विध्यार्थी व शिक्षक यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा समितीला मोठे सहकार्य केले. मुख्याध्यापक नंदकिशोर म्हापसेकर, शिक्षक व्ही. जी.पाटील, पी.जी.पाटील, राजाराम फर्जंद व अजय सावंत व त्यांचे सहकारी विध्यार्थी स्वयंसेवक भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी मोठी मेहनत घेत होते. 

    तर पोलीस प्रशासन, एस. टी. बस, आरोग्य विभाग, वीज नियंत्रण कक्ष आदींनी  याठिकाणी यात्रा नियोजनात हातभार लावला. शुक्रवारी पहाटे पासूनच गोवा राज्याबरोबरच, चंदगड , कोल्हापुर , बेळगाव येथीलही भाविक महाशिवारात्र उस्त्ववाला तेरवण मेढे या पांडवकालीन तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीला मोठी हजेरी लावली.  भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री. नागनाथाचे लाखो भाविक आहेत. महाशिवरात्री निमित्त तेथील पवित्र तीर्थ तळीत स्नान करून मग भाविक मनोभावे नागनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतात. यावर्षीही हा भक्तीचा अलोट महापूर याची डोही याची डोळा पाहवयास मिळाला. सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. पहाटे ४ च्या सुमारास देवता स्नान झालेनंतर तेथील शिवलिंगावर मानकरी मंडळींनी दुग्धभिषेक केल्या नंतर भाविकांसाठी श्री देव नागनाथ चे दर्शन घेता आले. देवता स्नान झालेवर भाविकांनीही पवित्र तीर्थतळीत स्नान करून श्री नागनाथच्या दर्शनास सुरवात केली. पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. सकाळपासून मंदिरात गर्दी लोटलेली असतानाही भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता आले. समितीचे अध्यक्ष देऊ गवस, उपाध्यक्ष रामकृष्ण गवस, सचिव नामदेव गवस, खजिनदार प्रदीप गवस,सह सचिव जयराज गवस, माजी अध्यक्ष व सदस्य भरत गवस, सखाराम सडेकर, वामन गवस, सोमा गवस, सुनील गवस या टीमसोबत मायकल लोबो यांनीही यात्रोत्सव  नियोजन साठी विशेष मेहनत घेतली. सावंतवाडीचे प्रांत, विविध पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी यांनीही श्री देव नागनाथचे शुक्रवारी दर्शन घेतल.

 तीर्थस्नान व श्री नागनाथ चे दर्शन, नवविवाहित जोडप्यांचे विधिवत तीर्थ स्नान , नवस फेडणे  व पवित्र पांडवकालीन तीर्थ तळीतील तीर्थ प्राशन करून भाविकांनी शिवरात्री उत्सव साजरा केला. 

युवा सेना व निंबाळकर कुटुंबीयांचे सरबत वाटप...

 दरम्यान तीर्थस्थान झालेनंतर भाविकांना नागनाथच्या दर्शनासाठी अनेक तास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. यावेळी या भाविकांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे  दोडामार्ग तालुका उबाठा युवासेना व राजेंद्र निंबाळकर मित्रमंडळ यांनी भाविकांसाठी मोफत सरबत वाटपची व्यवस्था केली होती.