सावंतवाडी भगवामय ; शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2025 13:59 PM
views 264  views

सावंतवाडी : स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन आयोजित शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजवाडा येथून युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या रॅलीस शुभारंभ करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे शहर भगवामय झालं होतं. 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन शिवस्वराज्य रॅलीच आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या रॅलीस शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, अमोल साटेलकर, अँड. राजू कासकर, सोमनाथ गावडे, महेंद्र सांगेलकर, पुंडलिक दळवी, नयनेश गावडे, संदीप धुरी, देव्या सुर्याजी, संतोष तळवणेकर, महेश पांचाळ, विजय कदम, दिनेश गावडे, अभिजित सावंत, अतुल केसरकर, श्रीपाद सावंत, किशोर चिटणीस, अजित सांगेलकर, बंटी जामदार, अजय गोंदावळे, साक्षी वंजारी, मोहिनी मडगावकर, पुजा दळवी,  कृतिका कोरगावकर, बाळू पार्सेकर, केतन सावंत, पांडुरंग काकतकर आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या रॅलीत सहभाग घेतला होता.