उबाठा शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी

Edited by: विनायक गांवस
Published on: March 17, 2025 17:56 PM
views 20  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज तिथीनुसार सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, उदय अळवणे, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर ,ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी माजगाव आदी शिवसैनिक उपस्थित होते