डिगसमध्ये होणार शिवजन्मोत्सव सोहळा

वेशभूषा, बाल दशावतार स्पर्धा, अफजलखानाचा वध पोवाडा असे भरगच्च कार्यक्रम
Edited by: भरत केसरकर
Published on: February 18, 2023 18:25 PM
views 264  views

कुडाळ : डिगस गावातील शिवप्रेमी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंतीच औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता शिवराज्य सोहळा व मिरवणूक, वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता बाल दशावतार स्पर्धा (यक्ष उद्धार) होणार आहे. साडे नऊ वाजता बक्षीस वितरण तर रात्री दहा वाजता अफजलखानाचा वध यावर पोवाडा सादरीकरण होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचा आवाहन शिवजयंती उत्सव समिती डिगस यांनी केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन अभिनंदन पवार यांच्या घराशेजारी खांदिचेगाळू येथे करण्यात आले आहे.