
सिंधुदुर्ग : निवडणूक आयोगामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याच बरोबर मुंबईतील शिवसेना भवनावर शिंदे दावा करणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. शिवसैनिकांच शक्तीस्थळ असणाऱ्या सेना भवनासह राज्यभरातील शिवसेना शाखांवर शिंदे व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याचेच पडसाद कोकणात उमटू लागलेत. दापोलीत ठाकरे आणि शिंदे समर्थक आमने-सामने आलेत. दोन्ही गटात जोरदार राडा झाला. शिंदे गटानं शिवसेना शाखा ताब्यात घेतली. त्यामुळे राज्यभरात या निकालानंतर पडसाद उमटणार आहेत.