शिवम वेतुरेकर यांचे आर्किटेक्चर परीक्षेत घवघवीत यश !

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: April 03, 2023 17:53 PM
views 419  views

सावंतवाडी : शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग  जिल्हाध्यक्ष तथा शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे तडफदार व्यक्तिमत्व संजय वेतुरेकर यांचे सुपुत्र, तसेच पिंगुळी (तालुका कुडाळ) येथील रहिवाशी शिवम संजय वेतुरेकर यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चर' ही पदवी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून संपादन केली असून त्यांनी ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली आहे.

शिवम यांस महाविद्यालयाचे प्राचार्य व आर्किटेक्ट संदीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नामवंत आर्किटेक्ट व ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्गनगरी येथील काम पूर्ण केले असे यशस्वी आर्किटेक्ट  सतीश मिराशी यांचेही वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले आहे.

शिवम वेतुरेकर याने कोल्हापूर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रशांत कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर्नशिप देखील पूर्ण केली आहे. शिवम वेतुरेकर यांच्यावर या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.