ढोल ताशांच्या गजरात मालवणात शिव शौर्य यात्रा दाखल !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 01, 2023 11:59 AM
views 130  views

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... जय भवानी जय शिवाजी...अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात भगवे ध्वज फडकावत आज रात्री मालवणात दाखल झालेल्या शिव शौर्य यात्रेचे शिव प्रेमिनी उत्साहात स्वागत केले. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शिव शौर्य यात्रेत दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचा भरणा होता. ही यात्रा मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या ठिकाणी आल्यानंतर या यात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले.


विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिव शौर्य यात्रा काढण्यात आली आहे. सिंधुदुर्गात या यात्रेचा आरंभ दोडामार्ग येथून झाल्यानंतर आज रात्री ही यात्रा मालवणात दाखल झाली. मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुंभारमाठ येथे वि शौर्य यात्रा मालवण प्रखंड प्रमुख डॉ. पंकज दिघे यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, बजरंग दल क्षेत्रीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी, कार्य अध्यक्ष रघुनाथराव धुळप (विजयदुर्ग), विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री विवेक वैद्य, विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष सौ. विशाखा रांगणेकर, जिल्हामंत्री आनंद प्रभू जिल्हा बजरंग दल सहसंयोजक प्रसाद ठाकूर, जिल्हा कार्यवाहक लवू महाडेश्वर, मालवण प्रखंड मंत्री सुनील पोळ, प्रदेश कार्यकरणी सदस्य दत्ता सामंत, भाजपा मालवण अध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष बबन शिंदे, उद्धव  विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री विवेक वैद्य, विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष सौ. विशाखा रांगणेकर, जिल्हामंत्री आनंद प्रभू, जिल्हा बजरंग दल सहसंयोजक प्रसाद ठाकूर, जिल्हा कार्यवाहक लवू महाडेश्वर, मालवण प्रखंड मंत्री सुनील पोळ, प्रदेश कार्यकरणी सदस्य दत्ता सामंत, भाजपा मालवण अध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष बबन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक संतोष लुडबे, यात्रा सहसंयोजक संदीप बोडवे, भाऊ सामंत, आपा लुडबे, दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, सौरभ ताम्हणकर, भिवा शिरोडकर, बाबा मोंडकर, ललित चव्हाण, निषय पालेकर, गौरव लुडबे आदी तसेच मोठ्या संख्येने शिव प्रेमी उपस्थित होते.

ही यात्रा भरड नाका येथे आल्यानंतर या यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात या यात्रेचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले त्याचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.