वेंगुर्लेत शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

आडेली जि. प. मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
Edited by: दिपेश परब
Published on: October 31, 2025 11:30 AM
views 850  views

वेंगुर्ले : वेंगुर्लेत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आडेली जि प मतदार संघातील आडेली, खानोली, वायंगणी व दाभोली मधील शेकडो विविध पक्षाच्या कार्यकर्त्यानी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. 

स्वामीनी मंगल कार्यालयात गुरुवारी (३० ऑक्टो) आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हे पक्षप्रवेश झाले. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रविण गडेकर, ओंकार धुरी, सचिन वेंगुर्लेकर, दिनेश पेडणेकरकर, दशरथ पेडणेकर, सेजल गवडेकर, मनस्वी साळगावकर, मनिष साळगावकर, ओंकार कामत, यश कामत, अक्षय कामत, समीर कामत, सचिन दुतोंडकर, विठ्ठल खरात, विजय गोवेकर यांच्यासहित आडेली जि प मतदार संघातील सुमारे १५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 

यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुहास कोळसुलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.