
कुडाळ : शिवसेनेमध्ये (शिंदे गट) संघटनात्मक फेरबदल सुरू असताना कुडाळ तालुक्यातील एक महत्त्वाचे नाव समोर आले आहे. आनंद शिरवलकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, शिरवलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांचे जुने सहकारी, निष्ठावान कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांना वाढदिवसाची खास भेट दिली. ही भेट आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
आनंद शिरवलकर यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कुडाळ तालुक्यातील शिवसेनेची (शिंदे गट) ताकद वाढण्यास मदत होईल.