शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य : आमदार निलेश राणे
Edited by:
Published on: June 09, 2025 17:29 PM
views 385  views

कुडाळ :  शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये देऊन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, महेश राणे, जिल्हा समन्वयकपदी महेश कांदळगावकर तसेच तालुका व शहर प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.

शिवसेनेची जुनी कार्यकारणी रद्द झाल्यानंतर नूतन कार्यकारणी निर्माण करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, दादा साईल, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वीपासून हा जिल्हा शिवसेनेचा होता. या जिल्ह्यामध्ये सध्या दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि उबाठा व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष वाढत आहे. कोणाच्या टीकेकडे लक्ष न देता आम्ही कामावर लक्ष दिके आहे असे सांगून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकरणी निर्माण करण्यात आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. तरी आपली तयारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. असे त्यांनी यावेळी सांगून नवीन कार्यकारणी नियुक्ती बाबत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे घोषणा करतील असे यावेळी सांगितले. 

नवीन कार्यकारणी झाली जाहीर

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर ( कुडाळ), महेश राणे (मालवण), महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते. ओरोस मंडळ अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, मालवण मंडळ अध्यक्ष राजा गावडे, मालवण मंडळ अध्यक्ष विनायक बाईत, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, मालवण उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा आमदार निलेश राणे यांनी दिल्या.

माझं ते ट्विट म्हणजे एका भावाने एका भावाला दिलेला सल्ला होता : निलेश राणे

नितेश राणे यांच्याबाबत केलेल्या ते ट्विट मी अधिकार वाणीने केलेले होते. नितेश हा माझा मोठा भाऊ असून त्याने मला वडिलांप्रमाणे मान दिलेला आहे. त्याला हक्काने बोलणे हा नितेशने मला दिलेला अधिकार आहे आणि त्या सहजतेने मी त्याला बोललो. मी ते ट्विट डिलीट केले. कारण मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो मी दिला. मी यापूर्वी सुद्धा अनेक ट्विट डिलीट केली आहेत. त्त्यामुळे हे ट्विट डिलीट केले. त्यातून वेगळा अर्थ काढू नका. उबाठाला यातून काही फायदा घेण्यासारखं काही नाही. एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला हा सल्ला होता.