
वैभववाडी : कणकवली येथे उद्धव ठाकरे यांनी घेतलेली सभा अनेकांच्या जिव्हारी लागली.पक्षप्रमुखांनी जनतेच्या मनातील विषय मांडले, त्यामुळे भाजपाचे नेते भांबावले आहेत.ते पत्रकार परिषदा घेऊन ते डबलबारी सारखे भांडत आहे.काहींना यांचा दुखवटा झाला आहे अस प्रत्युत्तर भाजपच्या टिकेला शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हे भाजपाला सहन झाले नाही.ठाकरे यांनी सत्ताधा-यांच वस्त्रहरण आपल्या भाषणातून केली.कल्याण येथील प्रकारासहीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कारभारावर केलेली वक्तव्य जनतेलाही पटली.तसेच जिल्ह्यातील यापुर्वीचा रक्तरंजीत इतिहास मांडल्यामुळे राणे सुपूत्रांना ते झोंबले. यातून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीप्रमाणे शिव्या शाप दिला.मात्र त्याच भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी समर्थन ही केले नाही.त्यामुळे ठाकरेंची सभा काही ठराविक लोकांना खुप जिव्हारी लागली असा टोला सरवणकर यांनी लगावला.