
वैभववाडी : तळेरे-गगनबावडा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्यावतीने पदयात्रा काढली जाणार आहे.करुळ ते नाधवडेपर्यंत ही पदयात्रा असून यात शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.थोड्याच वेळात करुळ येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे.खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचा प्रारंभ होणार आहे.तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेना व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करुळात दाखल होऊ लागले आहेत.