
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी तर्फे महिला तालुका प्रमुखपदी तुळस येथील दिशा शेटकर यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी येथे आज (२८ ऑगस्ट) झालेल्या महिला मेळाव्यात शिवसेना नेत्या मीना कांबळी यांच्या हस्ते तर उपनेत्या तृष्णा विश्वासराव व महिला आघाडी जिल्हाप्रमुख ऍड नीता सावंत - कविटकर यांच्या प्रमुख उपस्थितीग त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्षा आरोजीन लोबो, महिला आघाडी सावंतवाडी तालुकाप्रमुख यशश्री सौदागर, दोडामार्ग तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सावंतवाडी शहरप्रमुख भरती मोरे, वेंगुर्ला शहरप्रमुख ऍड श्रद्धा परब - बाविस्कर यांच्या सहित महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.