
देवगड : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुका यांच्यावतीने दि. १७ मार्च २०२५ रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सदर प्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व लॅब नेत्र चिकित्सालय डॉ. आठवले कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिविराचे सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. मोफत तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात येईल.
नेत्र तपासणी शिबिर हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कार्यालय देवगड, तहसील कार्यालय ऑफिस समोर होणार आहे. नेत्र रुग्णांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), तालुका प्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर, फरिद काझी, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडी यांनी केले आहे.