देवगडात रामेश्वरचा गड ठाकरे शिवसेनेने राखला..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 06, 2023 16:39 PM
views 128  views

देवगड : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रामेश्वर ग्रामपंचायतीवर ठाकरे शिवसेनने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.सरपंच पदासह सात जागा जिंकत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आपला करिष्मा दाखवला आहे.

तालुक्यात ८ग्रामपंचायीतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.याची आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.यामध्ये सर्वात महत्त्वाची असलेली रामेश्वर ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे.

ही निवडणूक भाजपा व शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली होती.मात्र जनतेने ठाकरे शिवसेनेला साथ देत सरपंच व सात सदस्य निवडून दिले.सरपंच पदासाठी मोनिका मधुकर दुकरूल ह्या विजयी झाल्या.तसेच सदस्य म्हणून अजीत घारकर, मिनल बांदकर,मोनिका ठुकरुल,.मिनेश मोंडे, संजना धुमाळ,शोभा घारकर,अजित घारकर हे निवडून आले आहेत.नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी अभिनंदन केले.