आंबेली रस्त्याचं शिवसेनेनं केलं भूमिपूजन

Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2023 17:54 PM
views 42  views

दोडामार्ग : आंबेली मुख्य रस्ता, आंबेली गावपर्यंत रस्ता डांबरीकरणसाठी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यस्तरीय बजेटमधून 16 लाख मंजूर केले होते. त्या रस्त्याचे भूमीपूजन शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थतीमध्ये बुधवारी झाले. यावेळी ज़िल्हा समन्वयक शैलेश दळवी , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस युवा प्रमुख, दादा देसाई उप तालुका प्रमुख, चेतना गाडेकर, राधिका गाडेकर, दादा पालयेकर, सरपंच अनिल शेटकर, मोहन गवंडे, राजन गवस उपसरपंच पाल आदी कार्यकर्ते व आंबेली ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेलीला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्यास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी दीपक केसरकर यांचे आभार मानले.