वझरे तळेखोल विर्डी रस्त्यावरील पुल बांधकामाचे शिवसेनेनं केलं भूमिपूजन

Edited by: संदीप देसाई
Published on: January 24, 2024 13:28 PM
views 155  views

दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासन बजेट अंतर्गत मंजूर झालेल्या वझरे तळेखोल विर्डी रस्त्यावरील  लहान पुल बांधकामाचे तळेखोल येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भिकाजी सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 

या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी  विधानसभाप्रमुख प्रेमानंद देसाई,  जिल्हा समन्वयक  शैलेश दळवी, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस,  युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री,  झरेबांबर सरपंच अनिल शेटकर,  तळेखोल सरपंच सौ. वंदना सावंत,  उपसरपंच महादेव नाईक,  ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, सिंचल सावंत, श्यामशंकर गवस,  स्वप्नजा दळवी,  शेळके, उर्मिला गवस,  ग्रामस्थ लाडु सावंत, सगुण सावंत, रामदास सावंत, मनोज वझे  व समस्त तळेखोल ग्रामस्थ उपस्थित होते. या नव्या पुलामुळे या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे.