
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिनी सावंतवाडी वैश्यभवन हॉलमध्ये विविध कार्यक्रम शिवसेना पक्षाच्यावतीने साजरे करण्यात आले. त्यावेळी शिवसेना पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा महिला आघाडीप्रमुख अॅड. सौ. निता सावंत कविटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, माजी नगरसेविका सौ. स्वप्ना नाटेकर, विश्वास घाग, उपजिल्हाप्रमुख सौ. अर्चना पांगम, शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. यशश्री सौदागर, चराठा सरपंच सौ. प्रचिती कुबल, अॅड. सौ. शितल टिळवे, सौ. निकीता परब, सौ. चैत्राली गावडे, सौ. दिव्या वायंगणकर, सौ. सुवर्णा गावडे, सौ. ऋतुजा परब, सौ. शितल टोपले, सौ. श्रावणी माळकर, सौ. सुविधा गावडे, सौ. नुतन कोकुळकर, सौ. प्रिया गोवेकर, सौ. अमिता नाणोसकर, आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या