समीर लांजेकर यांची शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक सहसचिव पदी

शाबान राऊत यांची वैभववाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी निवड
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 09, 2024 14:55 PM
views 97  views

वैभववाडी : ठाकरे शिवसेना अल्पसंख्यांक सहसचिव पदी समीर लांजेकर व वैभववाडी तालुका अल्पसंख्याक पदी उपाध्यक्ष शाबान राऊत  यांची निवड झाली. खा.विनायक राऊत यांनी नुतन पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रे दिली. कोळपे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन घडविणा-या लांजेकर व राऊत या जोडीवर  ठाकरेंच्या पक्षाने आणखी एक जबाबदारी दिली आहे. खा.राऊत यांनी दोघांचही कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, युवा सेना जिल्हा अध्यक्ष सुशांत नाईक, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मजीद भाई बटवाले, अल्पसंख्याक जिल्हा सचिव निसार भाई, तालुका अध्यक्ष जावेद भाई, नांदगाव शहर प्रमुख इमाम नावलेकर, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, कोळपे सरपंच सुनिल कांबळे, हमीद राऊत, दस्तगीर नाचरे, अहमदअली लांजेकर, युसूफ नंदकर, कासिम नंदकर, बाबा चोचे,बाबासाहेब लांजेकर  यांसह  कणकवली आणि वैभववाडीतील इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.