शिवसेनेचे भाजी व फुले विक्रेत्यांना छत्र्या वाटप..!

Edited by:
Published on: September 12, 2023 18:06 PM
views 171  views

दोडामार्ग : शिक्षण मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग शिवसेना कार्यालयात दोडामार्ग येथील फळ, भाजी व फुले विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्यात आले.  उन्हा पावसात स्वतःची रोजी रोटी मिळविण्यासाठी फिरता विक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या छत्र्यांच्या वाटप करण्यात आले. या वेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस,  युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री  शहरप्रमुख योगेश महाले उपस्थित होते.