नारायण राणेंच्या मूळगावात शिवसेनेने पाडले खिंडार !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2024 13:19 PM
views 1132  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरवडे या मूळगावातील कादर खान व यासीन खान यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांनी आज खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.त्यामुळे नारायण राणेंना हा धक्का मानला जात आहे. कणकवली विजय भवन येथे खा. विनायक राऊत यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. 

एकीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी  भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना त्यांच्याच मूळ गावातील मुस्लिम बांधवांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जिद अब्बास बटवाले,  जिल्हासरचिटणीस निसार शेख, सचिन सावंत, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, वैदेही गुडेकर, स्वरूपा विखाळे, अनुप वारंग, इमाम नावलेकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, धनंजय सावंत, सिद्धेश राणे आदी पदाधिकारी  शिवसैनिक उपस्थित.