
कणकवली : नाटळ हरकुळ विभागीय शाखा कनेडी येथील नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये शनिवार दि. २१ ऑक्टो. रोजी खास महिलांसाठी खेळ पैठणीच्या आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रात्री ७.०० वा. सुरू होणार आहे यासाठी प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, व्दितीय - पैठणी, तृतीय- पैठणी सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे असल्याने पंचक्रोशीतील बहुसंख्या महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्यावतीने करण्यात आले आहे.










