शिवसंस्कारच्या जिल्हास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

Edited by:
Published on: March 16, 2025 20:06 PM
views 252  views

सिंधुदुर्ग : मातृभूमी शिक्षण संस्था,सावंतवाडीच्या शिवसंस्कार च्या माध्यमातून २०१६ पासून घेण्यात येणाऱ्या छत्रपती श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे तिथीने असलेल्या शिवजयंतीदिवशी या परीक्षेचा निकाल संस्था जाहीर करत आहे. शिवसंस्कारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांच अभिनंदन करत कौतुक केलं आहे.सदर स्पर्धा ही इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शंभर गुणांचा लेखी पेपर घेतला जातो. प्रथम तीन क्रमांक व 15 उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातात. या परीक्षेसाठी देण्यात येणारे पुस्तक सखोल शिवचरित्राची माहिती मुलांना करून देते. तसेच या पुस्तकाच्या वाचनामुळे मुलांमध्ये शिवप्रेम जागे होऊन इतिहासाची आवड निर्माण होते. इतिहास विसरणारा देश कधीच इतिहास घडवू शकत नाही , म्हणून शिव संस्कार च्या माध्यमातून मुलांना इतिहासाचे धडे या निमित्ताने गिरवता यावेत यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

निकाल  खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक - मुग्धा प्रशांत टोपले,98 गुण, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल,सावंतवाडी.

द्वितीय क्रमांक - संपूर्णा सुधाकर राऊळ,97 गुण,मळगाव इंग्लिश स्कूल.मळगाव.

तृतीय क्रमांक - समीक्षा सचिन केसरकर, 95 गुण, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी.

तीनही विद्यार्थिनी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहेत.

उत्तेजनार्थ  

1.  गार्गी सचिन कांबळी, जनता विद्यालय तळवडे, 94गुण, आठवी

2.सई स्वागत नाटेकर कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी 93 गुण आठवी

3. किमया नंदकिशोर केसरकर, मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी, 92 गुण आठवी

4. मानसी प्रवीण डोंगरे, मळगाव इंग्लिश स्कूल, 91 गुण सातवी 

5. मृण्मय चंद्रकांत राऊळ ,मदर क्वीन इंग्लिश स्कूल, 90 गुण सातवी 

6. समृद्धी महादेव मडगावकर मदर क्वीन इंग्लिश स्कूल 90 गुण सातवी 

7.  दुर्गाराम पवन कुडतरकर, मदर क्वीन इंग्लिश स्कूल 90 गुण सातवी 

8. त्रिशा कृष्णाजी गावकर, मळगाव इंग्लिश स्कूल 88 गुण,आठवी 

9. ब्राह्मी रामदास निवेलकर, मदर क्वीन इंग्लिश स्कूल, 88 गुण आठवी

10. स्वरा विजय टिळवे ,मदर क्वीन इंग्लिश स्कूल, 87 गुण आठवी 

11. वेदा प्रवीण राऊळ ,यशवंतराव भोसले स्कूल 86 गुण सहावी 

12. समृद्धी चंद्रकांत राऊळ, मळगाव इंग्लिश स्कूल 86 गुण आठवी 

13. राधिका विश्वास सोनाळकर, मदर क्वीन इंग्लिश स्कूल 86 गुण आठवी 

14. वैभव विरेश राऊळ ,मदर क्वीन इंग्लिश स्कूल 86 गुण,आठवी

15. नेहल दिनेश मटकर मदर प्रिस इंग्लिश स्कूल 85 गुण आठवी

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शिवसंस्कारच्या वार्षिक सन्मान सोहळ्यामध्ये मान्यवर अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे तसेच प्रत्येक शाळेच्या सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या परीक्षेत स्वमत लिहिण्याच्या प्रश्नाच्या उत्तरा दाखल विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचनात आल्यामुळे आम्हाला सर्व इतिहास समजला,शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग समजले व त्यांनी किती कठीण परिस्थितीत स्वराज्य मिळवले ते समजलं, हे पुस्तक वाचून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली, यापूर्वी हा इतिहास आम्हाला कुठेच वाचायला मिळाला नाही असे नमूद केले.