
सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या इमारतीला गळती लागल्यानं येथील व्यापारी वर्गाच सहा लाखांहून अधिकच नुकसान झालं आहे. उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसह मुख्याधिकारी यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी शिवसैनिकांनी प्रशासनाला केला.
सावंतवाडी येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या इमारतीला गळती लागली आहे. यामुळे येथिल व्यापारी वर्गाच मोठ नुकसान होत आहे. सहा लाखांहून अधिकच नुकसान येथील व्यापाऱ्यांच झालं आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली. या नुकसानीला जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. यासंदर्भातील नुकसानभरपाई द्यायची तरतूद न.प.कडे नाही अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. यावेळी व्यापारी वर्गाच्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.
प्रशासनाकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच काम केलं जातं आहे. सावंतवाडीचा विकास नाही तर भकास झाली आहे अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी दिली. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहरप्रमुख शैलैश गवंडळकर, सतिश नार्वेकर, शेखर सुभेदार, राजा वाडकर आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.