आरोसमध्ये शिवजयंती निमित्त शिवविचार सोहळ्याचे आयोजन

नवी मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: जुईली पांगम
Published on: February 18, 2024 07:21 AM
views 114  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजावेत व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने निखिल नाईक व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांच्या संकल्पनेतून मागील  वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आरोस येथे शिवविचार सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. 

अशी आहे स्पर्धा !

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व आकारावी - बारावी अशा चार गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून प्रथम तीन क्रमांक  मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील  सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागासाठी शिवकथांवर आधारीत पुस्तकही दिले जाणार आहे. यास्पर्धेचे परीक्षण लेखक, कवी व पत्रकार दीपक पटेकर आणि पत्रकार व रंगकर्मी प्रवीण मांजरेकर करणार आहेत.

शिवविचार सोहळ्याचे संपूर्ण आयोजन व नियोजन विद्याविहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस  करत असून निखिल नाईक, संदेश देऊलकर व देवेंद्र कुबल यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर हे उपस्थित  राहणार असून ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांबाबत व करियर विषयक मार्गदर्शनही करणार आहेत.

अशी माहिती विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदाशिव धुपकर यांनी दिली.