
कणकवली : शिवजयंतीनिमित्त ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ, असलदे-गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी असलदे गावठण येथील शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. छ. शिवाजी महाराजांचे पूजन, सायंकाळी ७ वा. मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन, ७.३० वा. शाळेतील मुलांची शिवचरित्रावर भाषणे, रात्री ९ वा. स्थानिक भजन, १० वा. दिंडी भजन होईल. शिवप्रेमींनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.










