आरवली टांकच्या शिवप्रेमी मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा !
Edited by: जुईली पांगम
Published on: February 22, 2024 06:02 AM
views 201  views

वेंगुर्ला : शिवजयंतीचं औचित्य साधून आरवली टांक शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबीर आणि विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, भव्य बाईक रॅली आणि शिवव्याख्यानामुळे आरवली शिवमय झाली होती.


शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच, १ ली ते ४ थी वयोगटातील तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल, द्वितीय क्रमांक वेदांत संतोष नाईक, तृतीय क्रमांक मयुरेश प्रवीण मेस्त्री यांनी प्राप्त केलेत. लहान गट ५ वी ते ७ वी गटात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदिका शिवराम कुडव, द्वितीय क्रमांक  तेजल विष्णू केरकर, तृतीय क्रमांक प्रचिती विकास शेटये, उत्तेजनार्थ - आर्या नंदकिशोर धुरी क्रमांक पटकावलेत.  ८ वी ते १० वी मोठ्या गटात घेण्तायात आलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक दिप्ती तिमाजी गवस्कर, द्वितीय क्रमांक  प्रणव सखाराम कुडव, तृतीय क्रमांक इंदू वसंत गावडे, उत्तेजनार्थ प्राची संतोष कावळे यांनी पटकावले. तर सायंकाळी यशवंत गड रेडी ते मारुती मंदिर टांक अशी शिवज्योत रॅली काढण्यात आली. 

शिवजयंतीच्या दिवशी मारुती मंदिर टांक- शिरोडा-न्हैचीआड-मारुती मंदिर टांक अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली.  त्यानंतर शिवमूर्तीपूजन करत शिवरायांना अभिवादन करण्यात आलं.  शिवव्याख्याते शुभम धुरी, प्रसन्न सोनुर्लेकर यांचं शिवव्याख्यान झालं. दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या १ ली ते ४ थी लहान गटात तालुकस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कृष्णा राजाराम बागकर, द्वितीय क्रमांक देवेन सुंदर उडयर, तृतीय क्रमांक आराध्य निगोजी कोकितकर यांनी प्राप्त केलेत. ५ वी ते ७ वी मध्यम गटात घेण्यात आलेल्या तालुकस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श राजू चव्हाण, द्वितीय क्रमांक काशिनाथ संतोष तेंडोलकर, तृतीय क्रमांक  पूर्वा बापू भानजी यांनी मिळवले. ८ वी ते १० वी मोठ्या गटात घेण्यात आलेल्या तालुकस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक निधी यशवंत पेडणेकर, द्वितीय क्रमांक केतकी संतोष रेडकर, तृतीय क्रमांक विशाल अरुण पेडणेकर यांनी प्राप्त केलेत. तर सायंकाळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. परीक्षक म्हणून विष्णू रेडकर, वनिता नागवेकर, सौ. कुडव, विशाखा विलास वेंगुर्लेकर, सौ. गवंडे,  दीप फटनाईक यांचे सहकार्य लाभले. 


प्रमुख पाहुणे म्हणून नारायण पालयेकर, अनिल बागकर, सीमा आंसगावकर, श्रद्धा नाईक, समृद्धी कुडव, संतोष कुडव, दीपक चोपडेकर, बाप्पा जाधव, रवि बागकर, विलास बागकर, श्री मंचरे, श्री जाधव उपस्थित होते. शिवप्रेमी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं कौतुक करण्यात आलं.