खांबाळेत छ. शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव जल्लोषात !

मंगेश लोके मित्रमंडळ - शिवप्रेमी मित्रमंडळाचं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 20, 2024 10:08 AM
views 240  views

वैभववाडी :  मंगेश लोके मित्रमंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रशाळा खांबाळे येथे विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते  शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

   यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण,सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम,गुरूनाथ गुरव, लवू पवार,उमेश पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

     सकाळी ९.४० नंतर खांबाळे ते लोरे नं. २ बंगला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिल्पाला पुष्पहार अर्पण करून पुन्हा वैभववाडी छत्रपती संभाजी महाराज चौक ते खांबाळे केंद्रशाळा अशी भव्य मोटारसायकल,रिक्षा अभिवादन रॅली काढण्यात आली.

 सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू संपन्न झाले. वाभवे तांबेवाडी येथील ढोलपथकातून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी महिला व मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केली होती. मुलीं व महिलांसाठी १ ते ५ क्रमांक विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची मुली-प्रथम वैष्णवी विजय पवार (५ लिटर कुकर),द्वितीय निलम अजय पवार (३ लिटर कुकर),तृतीय सानिया सदानंद पवार (२ लिटर कुकर),चतुर्थ प्रणाली प्रकाश पवार (भाजीची कढई),उत्तेजनार्थ आर्या रामचंद्र परब (स्टीलचा चपाती डबा) आणि संगीत खुर्ची महिला-प्रथम समिक्षा सुनिल गुरव,द्वितीय वृषाली विजय पवार,तृतीय वेदिका प्रविण पालकर,चतुर्थ अंजली अशोक पवार,उत्तेजनार्थ रसिका राजेंद्र पवार  या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले.

       सायंकाळी.५.०० ते ७.०० श्री देव भैरव जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ भैरववाडी कुडाळ यांच्या पारंपारिक फुगडीचा कार्यक्रम संपन्न झाला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघनेश पवार, दिनेश पालकर, सत्यवान सुतार, जयेश पवार, विक्रांत पवार, नरेश पालकर, अक्षय पवार आदींनी विशेष मेहनत घेतली. संजय पवार बुवा,महेश लांजवळ,दत्तात्रय परब यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महिला व ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.