खांबाळेत शिवजयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रम आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 17, 2024 14:01 PM
views 72  views

वैभववाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी दि. १९ रोजी खांबाळे केंद्रशाळा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी रॅली, हळदीकुंकू, फुगडी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

    खांबाळे येथील शिवप्रेमी मित्र मंडळ व मंगेश लोके मित्र मंडळ या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजक आहेत. सकाळी ९ ते ९.३० वाजता शिवप्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन ९.३० ते १०.३० वा. खांबाळे ते लोरे नं. २ (लोरे बंगला) मोटरसायकल, रिक्षा रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन वैभववाडीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पुन्हा खांबाळे असे रॅलीचे नियोजन आहे.

    दुपारी ३.३० वाजता मंगेश लोके यांच्यातर्फे हळदीकुंकू, ३.३० ते सायंकाळी ४ या वेळेत वाभवे तांबेवाडी येथील ढोलपथक. सायंकाळी ४ ते ५ वा. मुलीं व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केली असून त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ वा. कुडाळ भैरववाडी येथील श्री देव भैरव जोगेश्वरी महिला मंडळाच्या फुगडीचा कार्यक्रम होणार आहे.

     शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम, शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव यांनी केले आहे.