
वैभववाडी : उबाठायुवासेनेचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.उद्या पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
धुरी हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ते म्हणून कार्यरत होते.तसेच युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम करीत होते.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी पक्षसंघटनेवर थेट आरोप करीत राजीनामा दिला होता.त्यांच्या या राजीनाम्याची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यावेळी मनधरणी केली होती.मात्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा जिल्ह्यात पक्षाचा पराभव झाला.यानंतर पक्ष सोडण्याचा धुरी यांनी निर्णय घेतला.आज त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाससीत , युवासेनेच्या सरचिटणीस पदाचाही राजीनामा दिला आहे.श्री.धुरी हे शनिवारी सकाळी मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.यासोबत अन्य पदाधिकारी पक्षाची साथ सोडणार आहेत.ठाकरे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.