
देवगड : देवगड तालुक्यात दिक्षित फाउडेंशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेमध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक हर्षल राजेश सनये तसेच उत्तेजनार्थ सान्वी समिर शिरवडकर यांचा रोख रक्कम व भेटवस्तु देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी मुलांना बाळासाहेब कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले होते. तसेच माघी गणेश जयंती निमित्त आयोजीत शालेय क्रिडा स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ महात्मा गांधी विदयामंदीर तळेबाजार येथे मुख्याध्यापक राजेश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत संपन्न झाली.
गणेश जयंती निमित्त श्री.गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर तसेच मराठी माणसाचा गजर मित्र परीवार तळेबाजार अध्यक्ष प्रविण पारकर व उपाध्यक्ष रोहण म्हापसेकर यांच्या संयुक्त विदयमानाने ५ वी ते १० वी पर्यंतच्या विदयार्थांसाठी क्रिडा स्पर्धेच आयोजन करण्यात आली होती.या क्रिडा स्पर्धेत चमचा गोटी , रस्सीउडया , संगीत खुर्ची अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये प्रथम , द्वितीय , व तृतीय क्रमांक काढण्यात आले . या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले. यावेळी या बक्षिस वितरण सोहळ्याचे सुत्रसंचलन अजित कदम तर आभार बाळासाहेब कोकरे यांनी मानले .