शिरोडा ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्षपदी सलग तिसऱ्या वेळी सिद्धेश परब

Edited by: दिपेश परब
Published on: August 23, 2025 11:56 AM
views 170  views

वेंगुर्ला :  शिरोडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सिद्धेश उर्फ भाई विजय परब यांची फेरनिवड सतत तिसऱ्या वेळी करण्यात आली. मागच्या दोन वर्षात एकही लेखी तक्रार शिरोडा ग्रामपंचायत कडे आली नसल्यामुळे शिरोडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वांनूमते ठराव घेण्यात आला. व पुन्हा सिद्धेश परब यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी.

यावेळी शिरोडा ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, माजी सरपंच विजय पडवळ, माझी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग नाईक, जगन बांदेकर, प्रथमेश उर्फ बड्या परब, अनिष्का गोडकर, रश्मी डीचोलकर, अर्चना नाईक, अनन्या घाटवळ, हेतल गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, प्राची नाईक, देऊ साळगावकर तसेच पंचायत अधिकारी इंगळे व नागरिक उपस्थित होते.