
दोडामार्ग : तब्बल प्रतिस्पर्धी सहा उमेदवारांना सरपंच पदाच्या निवडणुकीत पाणी पाजणाऱ्या पिकुळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच आप्पा गवस यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. अपेक्षित सदस्य पदाचे संख्याबळ हाती नसतानाही ऐनवेळी मोर्चे बांधणी करून सहकाऱ्यांच्या मदतीने अखेर बाळासाहेब शिंदे गटाच्या निलेश गुरुदास गवस यांची उपसरपंच पदी वर्णी लावण्यात यश मिळवले आहे.
दोडामार्ग तालुक्यात पिकुळे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी डबल सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळी अन्य सहा प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत सर्वाधिक मते मिळवून आपा गवस यांनी यश मिळविले होते. शुक्रवारी होणाऱ्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित सदस्य संख्या व नसल्याने नेमकं काय होणार यावर साशंकता होती. मात्र ऐनवेळी राजकीय घडामोडी यशस्वीपणे केलेली मोर्चेबांधणी कामी आल्याने आप्पा गवस व त्यांच्या टीमला आपलाच उपसरपंच ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आणता आला. विवेकानंद नाईक, तीलकांचन गवस, संदीप गवस या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आपा गवस यांनी पिकुळे गावात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची भक्कम पकड उभी केली आहे. या टीमचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी खास अभिनंदन केले आहे.