
पोयनार : पोयनार गावातील शिंदे गट शाखाप्रमुख वैभव दत्तात्रय खानविलकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. खेड तालुक्यातील पोयनार येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख वैभव दत्तात्रय खानविलकर, सिद्धेश महेंद्र विचारे, संजय दत्तात्रय खानविलकर, शुभंम संजय खानविलकर, यश वैभव खानविलकर, शांताराम केरू महागावकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूल थापांना कंटाळून दापोली मतदार संघाचे आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय.
या कार्यक्रमावेळी खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे, खेड तालुका सचिव मनोज भोसले, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, भरणे विभागप्रमुख अंकुश कदम, आस्तान विभाग प्रमुख विश्वास कदम, तळे गट सचिव ज्ञानदेव निकम, तिसे शाखाप्रमुख राजु मोहाने, धवडे शाखाप्रमुख विनोद जाधव, किरण मोरे, विनायक खानविलकर, सुभाष सुर्वे, रमेश माने, लक्ष्मण धुमक, निहाल माने, बंटी धुमक, सोहम खानविलकर, विकास पवार विभागातील सर्व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, महीला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.