आताची मोठी बातमी | शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपुरनजीक भरधाव डंपरची धडक | आमदार कदम सुदैवाने बचावले
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 08:02 AM
views 676  views

रायगड : माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.

आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.