निलेश राणेंनी वैभव नाईकांनाही पक्षात घ्यायला सांगितलं

राजन तेलींची मोठी माहिती
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2025 16:06 PM
views 1446  views

कुडाळ : युती व्हावी ही आमची इच्छा आहे. युती होताना कणकवली मतदार संघात सुद्धा शिवसेनेला अपेक्षित जागा मिळायला हव्यात. युती न झाल्यास जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले. 


कुडाळ येथील शिवसेना मेळाव्यात राजन तेली बोलत होते. ते पुढे म्हणाले, युतीचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळी घेतील. जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे. कुठेही गाफिल राहायचे नाही. यश येत नाही तोपर्यत लढत राहायचे. मी कोणतीही अपेक्षा ठेऊन पक्षात प्रवेश केला नाही. जिल्हा परिषदेवर भगवा फडकावा हिच आपली इच्छा. पक्ष वाढीसाठी सर्वानी प्रयत्न करायला हवे. निलेश राणे यांनी तर वैभव नाईक येत असतील तरी त्यांना घ्या असे सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया.