सावंतवाडी येथे शौर्य दिन साजरा

समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समिती यांचं आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 01, 2023 18:49 PM
views 292  views

सावंतवाडी : भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी घडलेल्या शौर्य दिनाच्या स्मृतीला अभिवादनाचा कार्यक्रम आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

 प्रारंभी ॲड एस.व्ही.कांबळे यांनी शौर्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव व ॲड कांबळे व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दि. के. पडेलकर, ॲड कांबळे यांच्यासह अंकुश कदम, विठ्ठल कदम, चंद्रशेखर जाधव, यशवंत डीगणेकर, संजय कदम, संदीप पिंगुळकर, परेश जाधव, शांताराम असनकर, प्रभाकर जाधव,आर.जी.चौकेकर, गौतम कांबळे, सद्गुरू जाधव, अनंत कदम,  भावना कदम, रश्मी पडेलकर, ममता जाधव, चंद्रशेखर जाधव व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांगेली येथील ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य भिकाजी कदम यांचा सत्कार करण्यात आला.