
सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात स्थानिक भाजप नेत्यांनी तिन्ही आमदार व खासदार भाजपचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याची भुमिका व्यक्त केली होती. भाजपच्या भुमिकेबाबत शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आज सकाळीच माझ बोलण झाल आहे. माझा मोबाईल तुम्हाला दाखवतो. त्यांनी सांगितले जो संकेत मला द्यायचा होता तो दिलेला आहे. सगळ्यांना काय सांगायचं ते बंद खोलीत सांगितले आहे. बंद खोलीतल सगळंच उघड सांगता येणार नाही. त्यामुळे कुणीही काळजी करू नका, आमची युती अखंड व मजबूत आहे. तर तिन्ही आमदार व खासदार महायुतीचेच असतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
संजय राऊत हे जामीनावर बाहेर आलेले आरोपी आहेत. ते पुन्हा आतमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी जपून बोलाव व कायद्याचं पालन करावं. ड्रग्सच्या संदर्भात
त्यांचा संबंध असेल. आमच्या पक्षाचा त्याचाशी कोणताही संबंध नाही. मुंबईचा पालकमंत्री झाल्यानंतर सगळे ड्रग्सचे अड्डे उद्धवस्त करण्याच काम मी केलं. ड्रग्स विरोधी म़ोहीम मी राबवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही तीच भुमिका आहे. पालकमंत्री नसलो तरी या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्यामुळे ड्रग्सच्या विरोधात मोठी मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविली आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण्याचा भानगडीत कुणी पडू नये, संजय राऊतनी काय केलं हे शिवसैनिकांनी जाणल आहे. त्यांना शिवसैनिक माफ करणार नाही असं विधान दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.