राकेश नेवगींच्या निधनामुळे राष्ट्रवादीची जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली !

अर्चना घारेंनी दिली माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: August 20, 2024 07:10 AM
views 189  views

सावंतवाडी : 16 ऑगस्ट 2024 पासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील गावा गावातून जाणार आहे. दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी पक्षाचे पदाधिकारी, सावंतवाडी शहर कार्याध्यक्ष राकेश नेवगी यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यामुळे 19 व 20 ऑगस्ट रोजी यात्रा थांबविण्यात आलेली आहे. तसेच सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारा दिवसांचा दुखावटा पाळण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुका व शहरातील  नियोजित कार्यक्रम आणि यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली. 

तसेच बदल करण्यात आलेल्या तारखा नंतर कळविण्यात येतील. फक्त दोडामार्ग तालुक्यातील नियोजन झालेले कार्यक्रमच  होणार आहेत. नेवगी कुटुंबीयांच्यावर या आकस्मित घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहे. त्यांच्या पावित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अर्चना घारेंनी केली.