प्रक्षोभक भाषण कराल तर खबरदार

शिवसेनेचे स्टार प्रचारक शरद कोळी यांना पोलिसांची नोटीस
Edited by: ब्युरो
Published on: November 13, 2024 09:24 AM
views 339  views

सावंतवाडी : शिवसेना उपनेते शरद कोळी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सावंतवाडी येथे सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ते मॅंगो हॉटेलमध्ये थांबले असता पोलिसांकडून कोळी यांना भर झोपेतुन उठवून मध्यरात्री बाराच्या सुमारास ही नोटीस बाजवण्यात आलीय. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ही नोटीस बजावली आहे.

सावंतवाडीच्या सभेत प्रक्षोभक भाषण वा आक्षेपार्ह भाषण न करण्याची सूचना त्यांना या नोटीसीने देण्यात आल्या आहेत. जाहीर सभेत आक्षेपार्ह व प्रक्षोभक भाषण करून राजकीय पक्ष, व्यक्ती वा वैयक्तिक कोणाच्याही भावना दुखावून शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे बाजवण्यात आले आहे.