शंकर वाळके यांचे निधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 28, 2023 14:54 PM
views 400  views

सावंतवाडी : सावंतवाडी बाहेरचावाडा येथील शंकर उर्फ दत्ता शांताराम वाळके यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील प्रतिथयश व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. बाजारपेठेतील लता लॉजचे ते मालक होते.

सावंतवाडी अर्बन बँकमध्ये देखील त्यांनी सुरुवातीच्या काळात काही वर्ष सेवा बजावली होती. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. शुक्रवारी रात्री उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मी इलेक्ट्रिकल्सचे अमित वाळके यांचे ते वडील होते.