शमिका नाईकचं प्रज्ञाशोध परीक्षेत सुयश...!

Edited by: विनायक गावस
Published on: April 07, 2024 09:13 AM
views 91  views

सावंतवाडी : ओटवणे करमळगाळू शाळा नंबर ४ची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी कुमारी शमिका मनोज नाईक हिने गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत पार पडलेल्या गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर जिल्ह्यात १२वा क्रमांक मिळविला. याच शाळेचा चौथी मधील विद्यार्थी चंद्रकांत बापू गावकर हा तालुक्यात तिसरा तर जिल्यात ७ वा आला तर यशवंत सखाराम गावकर हा चौथी मधिल विद्यार्थी तालुक्यात चौथा तर जील्यात १० वा आला. विशेष बाब म्हणजे एकाच शाळेतील या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्ते मध्ये तालुक्यात प्रथम पाच क्रमांकात राहण्याचा मान मिळविला. या तिन्ही विद्यार्थ्यांनी राज्यातील गुणवत्ता यादीतही आपली छाप सोडताना अनुक्रमे राज्यात ३६,२२ व २६ वा क्रमांक पटकावला. ओटवणे शाळा नंबर ४ ही एक छोटी शाळा मात्र बौद्धिक चाचण्या परीक्षा असो वा वक्तृत्व स्पर्धा असो वा मैदानी खेळ नेहमीचं येथील शाळेतील विद्यार्थी चमकत आहेत.आणि हिच परंपरा येथील गुणवंत विध्यार्थी आणि त्यांच्याकडून मेहनत करवून घेणाऱ्या शिक्षक वृंदानी राखली. परीक्षेत विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ पालक शिक्षक वृंद तसेच शालेय कमिटी कडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच या विध्यार्थ्यांच्या बुध्दीला चालना देत त्यांना योग्य मार्गदर्शन करत यशात मोलाचा वाटा उचलणारे मार्गदर्शक शिक्षक दिलीप चव्हाण, तसेच कांचन अणसुरकर यांचेही कौतुक व अभिनंदन होत आहे.