
मंडणगड : अंगणवाडी सेविका शलाका पवार यांना मंडणगड पंचायत समिती येथे आयोजीत कार्यक्रमात आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी सेस अंतर्गत सन 2023/ 24या आर्थिक वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
कुशल अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र बालशिक्षण अभ्यासक्रमाला दैनदिन अंगणवाडी पुर्ण करुन त्यांच्या परिपुर्ण नोंदी निश्चीत करुन दिलेल्या ग्रुपवर घेऊन तसेच अंगणवाडी केंद्रात बालशिक्षण दिवस साजरा करुन यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शलाका पवार या वेसवी नांदगाव येथे कार्यरत आहेत. त्यीं आफल्या अंगणवाडीत बालविकासाकरिता लागणारे अनेक प्रकारचे उपक्रम राबविले. स्तनदा माता, गरोदर व किशोर मुली यांचा आहार, आरोग्य व स्वच्छता व सप्टेंबर महिन्यात अनेक उपक्रम रबविले. त्यासाठी मातापालक बचत गट ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळवे.
मंडणगड येथे झालेल्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, बालविकास अधिकारी विकास जाधव, उमरोली बीट पर्यवेक्षीका एस.बी. कांबळे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.