'शक्तीवंदन'साठी केरळ केंद्रीय पदाधिकारी हरिहरण, प्रदेश समन्वयक साळवे सिंधुदुर्गात !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2024 10:36 AM
views 117  views

सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा "शक्तीवंदन " अभियानांतर्गत केरळ केंद्रीय पदाधिकारी वनिता हरिहरण  व प्रदेश समन्वयक आम्रपाली साळवे या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना यावेळी सावंतवाडी भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस शर्वरी गावकर, जिल्हा चिटणीस मिसबा शेख ,तालुका सरचिटणीस प्रियंका गावडे, सावंतवाडी महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होत्या.