
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेन जोरदार प्रचार सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शैलेश गवंडळकर, तेजल कोरगावकर यांनी 'डोअर टू डोअर' प्रचार भर दिला आहे. जुनाबाजार भागात त्यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी उबाठा शिवसेनेचे उमेदवार तेजल कोरगावकर यांनीही प्रचार करत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











