काय डोंगर, काय झाडी फेम शहाजी बापु पाटील यांची सिंधुदुर्गात होणार 'विशाल' एंट्री !

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाला धडाडणार मुलूखमैदान तोफ !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 11, 2022 14:44 PM
views 321  views

कुडाळ : भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात येत असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे. शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीत गेल्यानंतर आपल्या डायलॉग ने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचा एक स्वतंत्र चाहता वर्ग संपूर्ण देशभरात निर्माण झाला आहे. शहाजी बापू पाटील हे प्रथमच कोकणात येत आहेत आणि त्यांच्या आगमनाची कोकणवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.