
दोडामार्ग : साटेली -भेडशी परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गटारे तुडुंब होऊन गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालकांना तसेच व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व ग्रामपंचायत प्रशासनाने मान्सून सुरु होण्याआधी गटारे साफ करावीत अशी मागणी साटेली भेडशी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मान्सून पूर्व सुरु झालेल्या पावसाने साटेली भेडशी सह तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. गटार रस्ते नदीसारखे वाहत असून सर्वत्र पाणीच पाणीच झाले आहे. बाजारपेठेतील गटारे कचारा, प्लास्टिक बॉटल पिशवी मुळे जाम झाले आहेत. यामुळे पावसाचे पाणी गटारातून न वाहता थेट रस्त्यावरून वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यावर प्लास्टिक कचरा बॉटल आल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या ही वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत गटारे साफ करून त्रास दूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.